पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय ; गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी 12 स्पेशल ट्रेनचं नियोजन, बुकिंग कधीपासून?


पुणे : पुणे रेल्वे विभागानं गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांसाठी 12 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत.या गाड्यांचे आरक्षण २४ जुलैपासून सुरू होणार आहे. कोकणात गणोशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. त्यासाठी कोकणवासी आपली गावी जातात. पुण्यात नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने कोकणातील अनेक नागरिक राहतात. त्यामुळे रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्या होणार आहेत. रेल्वे क्रमांक ०१४४७ शनिवारी २३, ३० ऑगस्ट व सहा सप्टेंबर रोजी पुण्यातून रात्री १२ वाजून २५ वाजता सुटेल. ती रत्नागिरी येथे सकाळी ११.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४८८ साप्ताहिक विशेष रेल्वे शनिवार २३, ३० ऑगस्ट आणि सहा सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून दुपारी ५.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे पहाटे पाच वाजता पोहोचेल.

पुणे-रत्नागिरी वातानुकूलित साप्ताहिक विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०१४४५ मंगळवार २६ ऑगस्ट आणि दोन व नऊ सप्टेंबर रोजी पुण्यातून रात्री १२ वाजून २५ वाजता सुटेल. ती रत्नागिरी येथे सकाळी ११.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४४६ मंगळवार २६ ऑगस्ट आणि दोन व नऊ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून दुपारी ५.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे पहाटे पाच वाजता पोहोचेल.

दरम्यान मध्य रेल्वेने मुंबई /पुणे कोकण दरम्यान दहा मार्गावर 250 गणपती विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!