नाना पाटेकर माझ्या जीवावर उठलाय, त्याचे गँगस्टरशी संबंध, तनुश्री दत्ताचे खळबळजनक आरोप…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारतातील #MeToo चळवळीचा चेहरा ठरलेल्या तनुश्रीने एक भावनिक व्हिडीओ शेअर करत नाना पाटेकरवर गंभीर आरोप केले आहेत.

या व्हिडीओमध्ये ती सांगत आहेत की, गेल्या ४-५ वर्षांपासून तिचा स्वतःच्या घरात छळ होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. यानंतर ABP माझाशी बोलताना तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केले आहेत.
नाना पाटेकर आणि गँग त्रास देत असल्याचा आरोप तनुश्रीनं केलाय. याव्यतिरिक्त तिच्या स्वतःच्याच घरात तिला मानसिक त्रासाला, तसेच शारीरिक छळाला सामोरं जावं लागतंय, असं तिनं म्हटलं आहे.

अभिनेत्रीनं तनुश्री दत्तानं दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. नाना पाटेकर आणि बॉलिवूडची माफिया गँग मिळून मला त्रास देतेय, असं तनुश्री दत्ता म्हणाली. तसेच, नाना पाटेकरांचे गँगस्टरशी संबंध आहेत, मराठी माणूस म्हणून ते सहानुभूती घेतायत, असा आरोपही तनुश्री दत्तानं केला आहे.
तनुश्रीने सोशल मीडियावर एक इमोशनल व्हिडीओ शेअर केला असून, त्यात ती रडताना दिसते. तिच्या म्हणण्यानुसार, गेल्या ४-५ वर्षांपासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत आहे. कोणीतरी तिच्या घरात “हाऊस हेल्पर” प्लांट करून जेवणात काहीतरी मिसळत होते, ती वारंवार आजारी पडत होती. याशिवाय, उज्जैनमध्ये तिचा अपघातही घडवून आणण्यात आल्याचा दावा तिने केला आहे.
तनुश्री म्हणाली की, २०२० नंतर माझे सगळे मोठे प्रोजेक्ट्स एकामागोमाग एक रद्द झाले. माझा फोन आणि ईमेल हॅक करून सगळी माहिती त्यांना मिळत होती. मी कुठे जाते, कोणाशी बोलते, सगळं कळायचं. मग त्या लोकांकडून माझ्या कारकिर्दीत अडथळे आणले जायचे.” ती पुढे म्हणते, हे सगळं खूप योजनाबद्धपणे केलं गेलं. मला इंडस्ट्रीतून पूर्णपणे अलग केलं गेलं.
दरम्यान, या आरोपांमध्ये तनुश्रीने नाना पाटेकर, काही गुंडगिरी करणारे लोक आणि ‘गँग’ यांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. मराठी माणूस म्हणून सहानुभूती घेतो, पण प्रत्यक्षात माझ्या जीवावर उठला आहे, असा रोखठोक आरोप करत तिने नाना पाटेकरवर पुन्हा नव्याने वाद निर्माण केला आहे.
तनुश्रीने सांगितले की, २०२२ मध्ये मी उज्जैनला गेले होते. तेव्हा रिक्षाच्या ब्रेकमध्ये छेडछाड करून माझा अपघात घडवला गेला. माझी प्रकृती खूप खराब झाली होती. मी दोन-तीन महिने अंथरुणावर होते. पण मी पुन्हा उठून उभी राहिले आणि त्यांनी पुन्हा त्रास सुरू केला.
तिने दावा केला की, ही लोकं सातत्याने तिला फॉलो करत असतात. तिच्यावर पाळत ठेवली जाते, जेवणात काहीतरी टाकले जाते, वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप केला जातो. ती म्हणाली की, “हा एक संगनमताने चालणारा कट आहे, आणि यामागे इंडस्ट्रीतीलच लोकांचा हात आहे.