‘रमी ‘ वरून राजकारण तापलं ; माणिकराव कोकाटेंच राजीनामा देण्याबद्दल मोठ वक्तव्य, स्पष्टच म्हणाले,,…

पुणे : वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात बसून रमी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे कोकाटे यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या राजीनाम्यावर त्यांनी मोठं वक्तव्य केल आहे.ते म्हणाले, सगळ्या प्रकरणाची चौकशी करा. जर या चौकशीत मी दोषी आढळलो, तो व्हिडीओ खरा असेल तर मी नागपूर अधिवेशनाच्या आधी राजीनामा देईल, असे कोकाटे यांनी स्पष्ट केले.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही, मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळे ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांना मी कोर्टात खेचणार असल्याचे कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. मला विधानसभेचे सर्व नियम माहिती आहे, त्यामुळे विधानभवन काय कराव हे मला कळतं.मी गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही, तो दाखवला गेला नाही. पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे स्पष्ट झाले असते. तर मी आता या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान माझ्या बदनामी कोण आहे मी शोधून काढणार, या प्रकरणात सविस्तर चौकशी लावणार असून जर आरोप सिद्ध झाले तरच मी स्वतः राजीनामा देईन असं त्यांनी म्हटलं.
