पुणे हादरलं! पायी चाललेल्या विवाहित महिलेला ओढत झुडपात नेलं अन केलं भयानक कृत्य….

पुणे : स्वारगेट बसस्थानकात झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पुण्यात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्याच्या लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने रस्त्याने पायी चाललेल्या एका विवाहित महिलेला ओढत झुडपात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे हादरलं आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बाळू दत्तू शिर्के असं अटक केलेल्या ३५ वर्षीय नराधम आरोपीचं नाव आहे. तो मावळ तालुक्यातील जीवन येथील रहिवासी आहे. घडलेल्या घटनेच्या दिवशी मंगळवारी (१५ जुलै) दुपारी ३३ वर्षीय विवाहित महिला माहेरी जाण्यासाठी पायी निघाली होती. ती रस्त्याने एकटी चालत जात होती. यावेळी आरोपी बाळू शिर्के याची तिच्यावर नजर पडली. एकटीला पाहून नराधमाची नियत बदलली, त्याने दुचाकीवरून तिचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर कोणीही नसलेल्या ठिकाणी बाजूला झुडूपात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अवघ्या २४ तासांत पोलिसांनी घटनेची उकल केली आहे. पोलिसांनी एका जॅकेटवरून तपास करत नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत
दरम्यान घडलेल्या घटनास्थळापासून बऱ्याच लांब असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पीडितेचा पाठलाग करताना दिसून आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये शोधमोहीम राबवली आणि अखेर आरोपी बाळू शिर्के याला अटक केली.एका विवाहित महिलेवर दिवसाढवळ्या अत्याचार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
