बनावट कर्ज प्रकरणात केली ३० लाखांची फसवणूक, पाच जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?


पुणे : दापोडी, बोरीपार्धी, यवत, (ता. दौंड) गावच्या हद्दीत फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी बँक व पतसंस्थेमध्ये बनावट कर्ज प्रकरण तयार करून नात्यातील 5 जणांनी एकाची 30 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ही घटना जानेवारी 2015 ते 17 जुलै 2025 दरम्यान घडली आहे. याबाबत 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धनसिंग रघुनाथ घुले (वय-50, रा. उंडवडी, ता. बारामती) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मेहुणे बाळासाहेब हरिभाऊ वाघमोडे, सख्खा भाऊ भारत रघुनाथ घुले, बहिण संगीता बाळासाहेब वाघमोडे, भावजय सुनिता भारत घुले व ओळखीचे लक्ष्मण उमराव थोरात यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी व फिर्यादी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. 5 आरोपींनी संगनमत करून धनसिंग घुले व त्यांच्या पत्नीच्या नावावर बँक व पतसंस्थेमध्ये बनावट कर्ज प्रकरण तयार केले.पैसे काढून परतफेड न करता त्यांची 30 लाख 13 हजार 661 रुपयांची फसवून करून सदर रकमेचा अपहार केला. फिर्यादी धनसिंग घुले यांनी वरील पाच जणांना कर्ज भरण्यास सांगितले.

असे असताना मात्र त्यांनी नकार दिला तसेच त्यांना दमदाटी केली. यामुळे घुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज हे करत आहेत. दापोडी, बोरीपार्धी, यवत, (ता. दौंड) गावच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. याबाबत तपास सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!