धक्कादायक ; तुम्ही बहिणीकडे का जाता? बाप -लेकांमध्ये जोरदार वाद, अखेर वडिलांचा दुर्देवी शेवट

पुणे: जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथे मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केली असल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. तुम्ही वारंवार बहिणीकडे का जाता? या कारणावरून बाप-लेकामध्ये वाद झाला होता. त्यानंतर वडिलांची हत्या करण्यात झाली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी गणेशला अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर खंडागळे असं मृत पावलेल्या वडिलांचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्ञानेश्वर खंडागळे आणि त्यांचा मुलगा गणेश यांच्यात वाद सुरू होते. गणेशला त्याचे वडील ज्ञानेश्वर वारंवार त्याच्या बहिणीकडे जात असल्याचा राग होता.याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद इतका वाढला की, गणेशने आपल्या वडिलांना मारहाण करायला सुरुवात केली. त्याने ज्ञानेश्वर यांना जोरात ढकलून खाली पाडलं. त्यानंतर त्यांच्या छातीवर, पोटावर आणि डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.मुलाने केलेल्या मारहाणीत ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी तातडीने नारायणगाव पोलीस स्टेशनला फोन करून संपूर्ण माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ज्ञानेश्वर यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलीस जवान आनंदा चौगुले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गणेश खंडागळे याला अटक करण्यात आली आहे. तुम्ही वारंवार बहिणीकडे का जाता? याच प्रश्नावरून वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर गणेशने रागाच्या भरात हे कृत्य केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
