चलनी नोटा, नाणी, पासपोर्ट बनवण्याचे काम ठप्प होणार ; नागरिकांना थेट फटका, काय आहे कारण?


पुणे : नाशिकसह देशभरातील 7 करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस युनिट्समधील हजारो कामगारांनी 31 जुलैपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.त्यामुळे देशभरातील चलनी नोटा,पासपोर्ट,नाणे बनविण्याचे काम ठप्प होणार आहे. या संपाचा सर्वात मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिकमधील करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस येथील कामगार संघटनांनी व्यवस्थापनाला आंदोलनाची अधिकृत नोटीस दिली असून, हा संप नाशिकपुरता मर्यादित नसून, हैदराबाद, मुंबई, नोएडा, देवास, नर्मदापुरम आणि कोलकाता येथील सर्व 7 युनिट्समध्ये एकाच वेळी संपाची घोषणा करण्यात आली आहे. विविध प्रलंबित मागण्यासाठी संप पुकारण्यात येणार आहे. यामध्ये कामगारांनी केलेल्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे
–दिवाळी बोनसची निश्चितता
– सेवेतील मृत कामगारांच्या वारसांना तातडीने नोकरी देणे
– चालू भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि गैरप्रकार थांबवणे
– वैद्यकीय सुविधा सुलभ करणे

संप सुरू झाल्यास याचा सर्वात मोठा फटका आर्थिक व्यवस्थेला बसणार आहे. कारण देशभरात वापरल्या जाणाऱ्या चलनी नोटा, नाणी, पासपोर्ट, मुद्रांक व इतर सिक्युरिटी डॉक्युमेंट्स याच प्रेसमधून तयार केले जातात. कामगार आंदोलन 31 जुलैपासून सुरू झाल्यास, या सर्व उत्पादनांवर तात्काळ परिणाम होणार आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!