मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल, ते प्रकरण आलं अंगलट..


मुंबई : कालच्या दिवशी विधानभवनात आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात झालेल्या वादानंतर मोठा गोंधळ उडाला. विधानभवनातील वादग्रस्त घटनांनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर अखेर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मुंबई पोलिसांनी दाखल केला आहे.

ही कारवाई मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, यामागे विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेतल्याचेही समजते. नितीन देशमुख याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, त्याला जीपमधून नेत असताना आव्हाड यांनी जीपसमोर झोपून पोलिसांची कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले आहे.

यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या घटनेत नितीन देशमुख याला गंभीर मारहाण झाली होती. त्याचा शर्ट फाटला होता. यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनातही आमदार सुरक्षित नाहीत, असा आरोप केला होता. मात्र त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन देशमुख याला जेव्हा पोलिस घेऊन चालले होते, त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस वाहन अडवून आंदोलनाची भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांनी आता त्यांच्यावर थेट भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस तपास सुरु असून विधिमंडळात याबाबत विरोधक आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की, गोपीचंद पडळकर यांनी इशारा करुन नितीन देशमुख यांना मारण्यास सांगितलं. त्यामुळे जाणीवपूर्वक हा हल्ला झाला आणि नंतर गुन्हाही आमच्यावरच दाखल केला जातो, असा आरोप सध्या विरोधक करत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत रोहित पवार आक्रमक झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!