पुण्यात कुख्यात गुन्हेगाराची चक्क पोलिसांना धमकी ; तोंडावर मिरचीचा स्प्रे फिरवून पोलीस ठाण्याची तोडफोड


पुणे : मागील काही काळापासून पुणे कोयता गॅंग, वाढती गुन्हेगारी, ड्रग्ज तस्करी अशा घटनांमुळे बदनाम होत आहे. त्यामुळे गुन्हेगारी कृत्यांवर पुण्यातील पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच आता सहकारनगर पोलिस ठाण्यात कारवाईसाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर सराईत गुन्हेगाराने मिरची स्प्रे फवारून पोलिस ठाण्याची तोडफोड केली असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,दोन वेळा मकोका कारवाई झालेला आणि सध्या जामिनावर बाहेर असलेला ‘बारक्या लोंढे’ या कुख्यात गुन्हेगाराने सहकारनगर पोलिस ठाण्यातच थैमान घातल्याची धक्कादायक घटना घडली.सराईत गुन्हेगाराने मिरची स्प्रे फवारून पोलिस ठाण्याची तोडफोड केली.या हल्ल्यामुळे चार ते पाच पोलिस कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास झाला. त्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात तोडफोड करत काचा फोडल्या. रक्तबंबाळ अवस्थेत तो ओरडत राहिला आणि स्वतःला इजा करून घेतली. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले

सराईत गुन्हेगारावर दोन वेळा मकोका अंतर्गत कारवाई झाली असून, सध्या तो जामिनावर बाहेर आहे. अशा धोकादायक गुन्हेगाराने पोलिस ठाण्यातच थेट हल्ला केला, तरीही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहिले नाहीत.या प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर समाजात संताप व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!