कोविड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरण ; संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजित पाटकरांना जामीन मंजूर


पुणे : कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक करण्यात आली होती. आता, जवळपास दोन वर्षानंतर सुजित पाटकर यांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याची चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारावरून भाजप -ठाकरे गटाविरुद्ध आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर, महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोपांचा धुरळा उडवला होता. यामध्ये ठाकरेंच्या निकटवर्तीयांची चौकशी झाली होती. आता सुजित पाटकरांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. पाटकर यांना कोर्टाकडे आपला पासपोर्ट जमा करावा लागणार असून इतरही काही अटी जामिनासाठी कोर्टाने ठेवल्या आहेत.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात मोठा आरोप करत 36 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा ठपका ठेवत पाटकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. जवळपास दोन वर्षानंतर सुजित पाटकर यांना जामीन मंजूर झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!