यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा लागला छडा, पाच आरोपींना अटक..


दौंड : यवत येथील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी कोणीतरी अज्ञात इसमाने एक अनोळखी व्यक्तीचा खून केल्याचे निदर्शनास आले होते. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्वालाग्रही पदार्थ मयताचे शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवुन जीवे ठार मारले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. याबाबत पोळी तपास करत होते.

याबाबत आता दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचं आधारे मिसिंगची तपासणी सुरू असताना ढोकी पोलीस स्टेशन, जिल्हा धाराशिव येथील लखन किसनराव सलगर वय २४ वर्ष, रा. टाकळी ढोकी ता. जि. धाराशिव हा सदर गुन्ह्यातील अनोळखी मयत इसम असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता धक्कादायक प्रकार समोर आला.

यामध्ये योगेश दादा पडळकर, राजश्री योगेश पडळकर, विकास आश्रुबा कोरडे, शुभम उमेश वाघमोडे, काकासाहेब कालिदास मोटे यांनी संगनमताने कट रचून लखन किसनराव सलगर यास तीव्र धारदार तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून संपवले. तसेच ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकुन त्यास पेटवून देऊन जीवे ठार मारले असल्याचे कबुल केले आहे.

या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व यवत पोलीसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौड बापुराव दडस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर इत्यादींच्या पथकाने केली.

या तपासात पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सपोनि गहूल गावडे (म्था.गु. शा), मपानि महेश माने, सपोनि प्रविण संपांग, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, सहा. पो. फौजदार मचिन घाडगे (म्था.गु. शा), पो. हवा. मोमीन शेख (स्था.गु.शा), पो. हवा. अजित भुजबळ (ग्था.गु. शा), पो. हवा. अजय घुले (म्था.गु.शाखा). पो. कॉ. धिरज जाधव (ग्था.गु.शा), पो. हवा. संदीप देवकर, पो. हवा. गुरुनाथ गायकवाड, पो. हवा. अक्षय यादव, पो. हवा. विकास कापर, पो. हवा, दत्ता काळे, पो. हवा. महेंद्र चांदणे, पो. हवा. रामदास जगताप यांनी केली.

तसेच पो. हवा. नारायण वलेकर, पो. हवा. गणेश कर्चे, पो. हवा. सुनिल नगर, पो. हवा. विनायक हाके, पो. हवा. संतोष कदम, पो. हवा. प्रमोद गायकवाड, पो. हवा, परशुगम म्हस्के, पो. हवा. प्रमोद शिंदे, पो. हवा, वैभव भापकर, पो.कॉ. मारूती बागते, पो. कॉ. विनोद काळे, पो. कॉ. दिपक वेताळ, पो. कॉ. प्रणव ननवरे, पो. कॉ.प्रतिक गरूड, पो. कॉ. शुभम मुळे पो. कॉ. सचिन काळे, पो. कॉ. मोहन भानवसे, म.पो.कॉ. स्वप्नाली टिळवे यांनी तपास केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!