ब्रेकिंग! शरद पवार गटात मोठा धमाका! जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, नवीन प्रदेशाध्यक्षाचे नावही ठरलं…


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. असे असताना आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असून मंगळवारी आमदार शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होत्या. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपल्याला पदामधून मुक्त करावे अशी मागणी केली होती. तेव्हापासूनच याबाबत चर्चा सुरू होत्या. यामध्ये अनेकांची नावे पुढे आली होती.

जयंत पाटील यांनी याबाबत मागणी केली असता याबाबत सर्वजण निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी सांगितले होते. या सर्व घडामोडीवर आज जयंत पाटलांनी अखेर राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याविरुद्ध पक्षांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे देखील बोलले जात होते.

पक्षाचे युवा आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये वाद असल्याचे देखील अनेकांनी म्हटले होते. याबाबत आता मंगळवारी शरद पवार यांनी बैठक बोलावली असून यामध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारतील असे सांगितले जात आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून पक्षात कुजबूज सुरू होती.

दरम्यान शरद पवार आणि अजित पवार हे दोन वेगवेगळे गट झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांच्यासोबत थांबणे पसंत केले एकनिष्ठ म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख आहे गेल्या लोकसभा आणि विधानसभेत त्यांचा थोडक्यात पराभव झाला असला तरी विधान परिषदेवर ते आमदार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!