गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री! यशश्री मुंडेंनी निवडणुकीसाठी भरला अर्ज, जाणून घ्या..


बीड : भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्याही राजकारणा त आल्या आहेत. यामध्ये आता यशश्री मुंडे यांनी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँक निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज भरला आहे. यशश्री मुंडेंसोबत माजी खासदार प्रितम मुंडेही या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. यामुळे निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परळी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे या भगिनींसह 71 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 14 जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी आणि 15 ते 19 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे.

यशश्री मुंडे या वकील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट’ म्हणून गौरवही करण्यात आला. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 10 ऑगस्टला मतदान तर 12 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकी निमित्त दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या मुलीचे लॉन्चिंग होत आहे.

यामुळे आता तिन्ही कन्या राजकारणात आल्याचे समोर आले आहे. कॉर्नल विद्यापीठ जगातील पाच विद्यापीठांपैकी सर्वोत्तम विद्यापीठ आहे. या विद्यापीठात जगातील केवळ 11 टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे या दोघींचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. तर यशश्री यांनी शिक्षण इंग्रजी शाळेतून पूर्ण केले आहे.

इतकी वर्षे त्या राजकारणापासून लांब असल्याच्या दिसून आल्या होत्या. मात्र आता वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आहे, या निवडणुकीच्या निमित्ताने तिसऱ्या मुलीचे लॉन्चिंग होत आहे. दरम्यान, भाजपचे दिवगंत नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची राज्यात मोठी लोकप्रियता होती. २०१४ मध्ये एका अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!