मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींना विवस्त्र केलं, पालकांचा संताप; मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर गुन्हा दाखल..


ठाणे : एका इंग्रजी माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने त्यांना विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर शहापूर पोलिसांनी मुख्याध्यापिकेविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे असून अटक करण्यात आली आहे.

हा प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातील नामांकित आर एस दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये घडला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्यध्यापिकेसह आठ जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच शिक्षिका, दोन महिला कर्मचारी, एक शिपायाचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापूर शहरातील आर एस दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये ३०० च्या जवळपास मुली शिक्षण घेत आहेत. ८ जुलै रोजी सकाळी १० ते १२ च्या सुमारास मुख्यध्यापिकांनी मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावले.

त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर आणि बाथरुमच्या लादीवरील रक्ताचे डाग असलेले फोटो प्राजेक्टरवर दाखवले. मासिक पाळी आली आहे किंवा नाही याबाबत विचारणा त्यांनी विद्यार्थिनींकडे केली. त्यानंतर ज्या मुलींना मासिक पाळी आली आहे

त्या मुलींच्या हाताचे ठसे घेण्यास ५ शिक्षिकाना सांगितले. तसेच ज्या मुली त्यांना मासिक पाळी आली नाही असं सांगतात त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणी करण्याचे आदेश महिला कर्मचाऱ्यांना दिले.

दरम्यान, या धक्कादायक घटनेची माहिती समजताच पालकांनी काल (ता.९) शाळा गाठत मुलींसोबत घडलेल्या प्रकराचा जाब विचारत गोंधळ घातला. दुसरीकडे इयत्ता५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशा रीतीने या विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद प्रकार केल्याचा आरोप केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!