आमदार निवासात आमदार संजय गायकवाडांना शिळं जेवण दिलं, बनियन अन् टॉवेलवरच बाहेर येत कॅन्टीनमध्ये राडा, थेट मारहाणच केली…


मुंबई : बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा राड्यामुळे चर्चेत आले आहेत. आता आमदार निवासात शीळ व निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा घातल्याची माहिती समोर आली आहे. याचा विडिओ देखील व्हायरल झाला आहे.

यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. यावेळी त्यांनी आमदार निवासमधील कॅन्टीन व्यवस्थापकाला देखील सुनावलं आहे. रात्री मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डर प्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवण खराब असल्याचे त्यांनी सांगितले.

जेवणात वरण आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला. त्यानंतर गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं. यावेळी त्यांनी मारहाण देखील केली. यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले.

तसेच काल कोणीही जेवणाचं बील देऊ नये असं सांगण्यात आलं, त्याचवेळी आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरच्या कानशिलात लगावली. यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले आहे. आता हा मुद्दा सभागृहात उचलणार असल्याचे देखील त्यांनी संगीतले.

दरम्यान हे अन्न खराब असल्याचे त्यांच्या लक्षात येताच आमदार संजय गायकवाड बनियन अन् टॉवेलवरच बाहेर येत कॅन्टीन डोक्यावर घेतलं. यावेळी मोठी गर्दी झाली होती. इतर कोणीही बिल देऊन नका असेही ते म्हणाले. आमदार निवासात अनेकदा जेवण आणि राहण्याच्या सुविधेवरून अनेकदा तक्रारी आल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!