लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी! आजपासून जून महिन्याचे 1500 रुपये मिळणार…


मुंबई : लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेंतर्गत जून महिन्याचे पैसे देण्यासाठी राज्य सरकारने ३६०० कोटी रुपये वर्ग केले आहेत. योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सोमवार, ३० जूनपासून १५०० रुपये जमा करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

यामुळे बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. याबाबत अनेकांची नावे देखील कमी झाल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारकडून दर महिन्याला २ कोटी ४६ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा करण्यात येतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पैसे मिळणार असे सांगितले जात होते.

असे असताना मात्र त्याआधीच पैसे मिळणार आहेत. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने जून महिन्याचे पैसे अद्याप जमा केले नव्हते. अखेर सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधक सरकारवर टीका करतील, या भीतीने राज्य शासनाने लाडक्या बहिणीसाठी काल ३६०० कोटी रुपये महिला व बालकल्याण खात्याकडे वर्ग केले.

आता आजपासून महिलांच्या खात्यावर १५०० रुपये जमा होतील. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या महिला नियमात बसत नाहीत, अशा महिलांना पैसे मिळणार नाहीत. यामुळे अनेकांची नावे कमी होणार असून त्यांना पैसे मिळणार नाहीत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत सांगितले की, या योजनेंतर्गत जून महिन्याचे पैसे देण्यासाठी राज्य सरकारने ३६०० कोटी रुपये वर्ग केले आहेत. योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सोमवार, ३० जूनपासून १५०० रुपये जमा करण्यात येतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!