अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या माळेगावच्या मतमोजणीला सुरुवात! ‘ब वर्ग’ गटात काय घडणार? निकालाकडे राज्याचे लक्ष…


बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः उभे राहत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्गात आपली उमेदवारी दाखल केल्यापासून कारखाना कोणाच्या ताब्यात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच अजित पवार यांनी मीच चेअरमन होणार असल्याचे सांगितले आहे. सध्या चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांची जोडी मुख्य विरोधक आहेत.

त्यांनी जोरदार टीका करत सभा गाववल्या. अजित पवार यांच्यावर त्यांनी टीका केली. यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली. दरम्यान, आता प्रशासकीय इमारतीत मतमोजणी सुरू झाली असून मतमोजणीची जागा अचानक बदलल्याने देखील चर्चा झाली.

सुरुवातीला माळेगावमध्येच कार्यालयात ही मतमोजणी होणार होती. मात्र अजित पवारांनी दबाव आणून हे ठिकाणी बदलले असल्याचे विरोधकांनी सांगितले आहे. यामुळे आता मतदारांनी नेमकं कोणाला कौल दिला हे लवकरच समजणार आहे. याठिकाणी सध्या मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ब वर्गातून अजित पवारांचा विजय सोप्पा असल्याचे सांगितले जात असेल तरी आम्ही मोकळं सोडलं नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रराव तावरे यांनी दिली आहे. यामुळे विजय कोणाचा होणार हे येणाऱ्या काही तासातच समजणार आहे. याठिकाणी चार पॅनल उभे राहिले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!