इराणवर अमेरिकेचा हल्ला, भारताच्या हवाई हद्दीचा वापर? आता खरी माहिती आली समोर…

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेने देखील उडी मारली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले केले. यामुळे मोठी खळबळ उडाली. अमेरिकेने आपल्या अत्याधुनिक विमानांच्या मदतीने हे हल्ले केले. याचे विडिओ देखील व्हायरल झाले आहेत.
यामुळे संघर्ष अजूनच पेटला आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला धक्का लागला असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यात भारताचाही अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे बोलले जात आहे. आता याबाबत खरी माहिती समोर आली आहे.
ही माहिती भारत सरकारने या सर्व दाव्यांना स्पष्ट शब्दांत फेटाळलं आहे. ऑपरेशन मिडनाइट हॅमर अंतर्गत अमेरिकेने इराणमधील फॉर्डो, नतांज आणि इस्फाहान या तीन महत्त्वाच्या अण्विक केंद्रांवर हल्ला केला. यावेळी अमेरिकेने ‘बंकर-बस्टर’ बॉम्ब वापरून हे प्रकल्प उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे यामध्ये भारताचा सहभाग होता का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अमेरिकेच्या बॉम्बर्सनी भारताची हवाई हद्द ओलांडून हे मिशन पार पाडलं. काही पोस्ट्समध्ये भारताच्या अप्रत्यक्ष सहभागाचाही उल्लेख करण्यात आला होता. मात्र ही माहिती खोटी असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरो अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की, ऑपरेशन मिडनाइट हॅमरसाठी अमेरिकेने भारताची एअरस्पेस वापरल्याचे दावे पूर्णपणे चुकीचे, निराधार आणि तथ्यहीन आहेत, याबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे.