लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता नेमका मिळणार तरी कधी?, महत्वाची माहिती आली समोर..

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
या योजनेअंतर्गत राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा थेट DBT च्या माध्यमातून १५०० रुपये जमा केले जातात. आतापर्यंत एकूण ११ हप्ते जमा झाले असून, आता जून महिन्याचा १२वा हप्ता मिळणार आहे.
तसेच सामान्यपणे हप्ता दर महिन्याच्या १५ तारखेच्या पुढे जमा केला जातो. मात्र यावेळी उशीर झाल्याने महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा हप्ता पुढील आठवड्यात म्हणजे जूनच्या अखेरीस बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि, राज्य शासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाकडून राज्य सरकारला मिळालेल्या डेटाच्या आधारे, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांहून अधिक आहे, अशा महिलांना योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे.