जागतिक बाजारपेठेत खळबळ!! पेट्रोल-डिझेलसह सोन्याचे दर गगनाला भिडणार, महत्वाचे कारण आलं समोर…


नवी दिल्ली : इस्रायल-इराण संघर्षाकडे जगाचं लक्ष आहे. तेल आणि गॅस निर्मितीचं केंद्र असणाऱ्या म्हणजे मध्य-पूर्व आशिया क्षेत्रात हा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष इतर देशांपर्यंतही पसरणार का, मिडल ईस्टमधल्या दोन शक्तीशाली सत्तांमधला हा संघर्ष युद्धाचं रूप घेणार का याविषयीची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेने इराणच्या अणुसंशोधन केंद्रांवर हल्ला केल्यानंतर जागतिक बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. याचा थेट परिणाम इंधन दर, सोन्याच्या किंमती आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय ब्रेंट क्रूड फ्युचर्सचे दर एका आठवड्यात तब्बल ११ टक्क्यांनी वाढले असून प्रति बॅरल दर ८० डॉलर्सवर पोहोचले आहेत. इराण हा तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा असलेला देश असून, चीन, भारत, जपान, इटली आणि ग्रीस यासारखे देश त्याच्यावर तेलासाठी अवलंबून आहेत.

इराणमधील तेल आणि गॅस क्षेत्रांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे उत्पादन ठप्प झालं आहे. हैफा रिफायनरीही बंद करण्यात आली आहे. Goldman Sachs च्या अहवालानुसार, जर युद्ध सुरूच राहिलं, तर कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात.

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर २००–२३० रुपये प्रति लिटरच्या आसपास पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. HPCL, BPCL आणि IOCL सारख्या कंपन्यांवर याचा मोठा परिणाम होईल. पेट्रोलियम आयात महाग झाल्याने सरकारवरही अनुदानाचा भार वाढेल.

भारतासह जगभरात अन्नधान्य, कपडे, रसायने यांच्याही किमतीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका व्याजदर कपातीच्या धोरणावर पुनर्विचार करू शकतात. सध्या भारतात महागाई नियंत्रणात आहे, पण युद्धजन्य परिस्थितीने ती पुन्हा बळावण्याचा धोका आहे.

अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. अलिकडेच सोन्याने १ लाख रुपयांचा टप्पा पार केला होता. आता युद्धामुळे सोन्याच्या दरात आणखी तेजी येईल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढेल, आणि त्यामुळे भाव नव्या उच्चांकी पोहोचू शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!