माळेगाव कारखान्यात एकूण 88 टक्के मतदान, आता निकालाकडे राज्याचे लक्ष, धक्कादायक निकाल लागणार? सभासदांमध्ये चर्चा…


बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. माळेगाव कारखान्यात एकूण 88 टक्के मतदान झाले. आता निकालाकडे राज्याचे लक्ष लागले असून धक्कादायक निकाल लागणार असल्याची चर्चा सभासदांमध्ये आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार स्वतः उमेदवार असून तेच चेअरमन पदाचे उमेदवार देखील आहे.

तसेच ब वर्गमध्ये 99 टक्के मतदान झाले आहे. याठिकाणी अजित पवार यांचा सहज विजय होईल असे सांगितले जात असले तरी इतर ठिकाणी मात्र लढत बघायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. विरोधी रंजन काका तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी देखील तगडे आव्हान दिले आहे.

कारखाना निवडणुकीमध्ये चार पॅनल तयार झाल्याने यासाठी सर्वांनी आपली ताकद पानाला लावली आहे. अजित पवार आणि चंद्राव तावरे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केल्याने निवडणूक चांगलीच गाजली. या निवडणुकीमध्ये शरद पवार गट तसेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे चंद्रराव तावरे रंजन काका तावरे आणि शेतकरी पॅनल असे चार पॅनल आहेत.

दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री अकरा वाजेपर्यंत चालू असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप झाल्याचा आरोप होत आहे. तसेच मतदान मतमोजणीची प्रक्रिया याचे ठिकाण देखील बदलण्यासाठी अजित पवारांनी दबाव आणल्याचे बोलले गेले. यामुळे निवडणूक चांगलीच गाजली आहे.

यामुळे अजित पवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून मागील दहा-बारा दिवस ते बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत. खासदार सुप्रिया सुळे तसेच युगेंद्र पवार यांनी देखील प्रचारसभा घेतल्याने आता रंगत वाढली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!