‘सोरतापवाडी’त आंतरराष्ट्रीय योगदिनी पर्यावरण वचनबद्धता! योग प्रशिणार्थी वाढवित आहे योगची महती….


उरुळीकांचन : योगसाधनेची पर्यावरण व निसर्गाच्या कटिबद्धतेची भावना अंगिकारात योगसाधनेने आरोग्य सुदृढतेशिवाय पर्यावरण सुसंगवात वाढवून पर्यावरण संतुलन राखण्याची मानवकल्याणाची जबाबदारीची संकल्पना जपित सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील सोरतापवाडी योग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन मार्गदर्शक कार्यक्रम राबवून साजरा केला आहे.

‘एक पृथ्वी एक आरोग्य’ या थिमवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना सोरतापवाडी (ता. हवेली ) येथील योग ग्रुपने योगदानिमित्त मार्गदर्शक कार्यक्रम घेऊन योगदिन साजरा केला.योगसाधनेचे केवळ आरोग्य सुदृढ राखण्यासाठी महत्व न बाळगता योगसाधनेची भूमिका ही हवा, पाणी व अन्न या सर्व गोष्टींशी जोडल्याने योगसाधनेत पर्यावरण संतुलन राखण्याची जबाबदारी योग साधनेत आहे. त्यामुळे भविष्यात ही संकल्पना रुजविण्यासाठी या साधनेतून प्रयत्न होत आहे. या उद्देशाने योगसाधनेचे कार्य भविष्यात वाढविण्याची जबाबदारी पेलण्याचे प्रेरणा या योगदिनाच्या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आली.

सोरतापवाडी येथे योग ग्रुपच्या वतीने गेली ७ वर्षे नित्यनेमाने योग वर्ग चालू आहे. या वर्गात पुरुष आणि महिला स्वतंत्रपणे या प्ररहरात वर्ग भरवून योग साधना करीत आहेत. या ग्रुपच्या वतीने योग शिक्षणपदवी अभ्यासक्रम तसेच योग कार्यक्रमांत योगासनांची प्रत्याक्षिके सादर करण्याची आवड या ग्रुपने अंगिकारली आहे. त्यांच्या या कार्यातून त्यांनी आदर्श जीवन संकल्पना रूजविण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या या योगवर्गास पल्लवी वेताळ या योगशिक्षिका त्यांना योगसाधनेचे प्रशिक्षण देत आहेत. तर निसर्गोपचार आश्रम उरुळीकांचन तर्फे जालिंदर वाडेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग वर्ग सुरू आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!