बोरीऐंदी गावच्या सरपंचपदी प्रज्ञा गायकवाड यांची निवड…


यवत : दौंड तालुक्यातील बोरीऐंदी गावच्या सरपंचपदी प्रज्ञा संदीप गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तत्कालिन सरपंच भानुदास कुदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदासाठी समंजसपणाने एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जे.एस.भोसले, प्रकाश जाधव, विपुल पाटील यांनी सरपंचपदी प्रज्ञा संदीप गायकवाड यांची निवड केली.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित सरपंच प्रज्ञा गायकवाड यांनी सांगितले की, महिला सरपंच म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे.गावातील महिलांचे तसेच नागरीकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडविण्यासाठी मी तत्पर आहे.

याप्रसंगी बोरीऐंदी सोसायटीचे माजी अध्यक्ष मुरलीधर भोसेकर, प्रताप तावरे, रविंद्र गायकवाड,माजी सरपंच बाळासो गायकवाड, सविता मंगेश भोसेकर, शुभांगी सचिन गायकवाड, प्रगती अमोल गायकवाड, रुपाली समिर गोठे, जीवन पवार, गणेश दौंडकर,दत्ता शेलार,विजय दरेकर आदी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!