आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखांपर्यंत कर्ज, कसं मिळवायच कर्ज? जाणून घ्या….


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

तसेच आता मुंबईतील महिलांना १ लाख रुपयांपर्यंत कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे. मुंबई बँकेकडून हे कर्ज दिलं जाणार असून महिलांना उद्योजकतेकडे वळवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना छोट्या व्यवसायासाठी पूरक भांडवल उपलब्ध करून देणे हा आहे. आतापर्यंत महिलांना या योजनेंतर्गत ९ टक्के दराने कर्ज देण्यात येत होते, मात्र आता त्यात मोठा बदल करत शून्य टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

या योजनेतून एकट्या महिलेसह समूहातील ५ ते १० महिलांना एकत्र येऊन व्यवसाय सुरू करण्याची संधी दिली जात आहे. प्रवीण दरेकर यांनी सांगितलं की, महिलांनी अर्ज केल्यानंतर त्यांचा व्यवसाय तपासला जाईल आणि मग कर्ज मंजूर होईल. विशेष म्हणजे या कर्जावरील व्याज शासनाच्या चार महामंडळांमार्फत परत दिलं जाणार आहे.

या चार महामंडळांमध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या-विमुक्तांसाठीचं महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचा समावेश आहे. या योजनांमधून महिलांना १२ टक्क्यांपर्यंत व्याज परत मिळतं, त्यामुळे प्रत्यक्षात महिलांसाठी कर्ज मोफत ठरतं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!