एअर इंडियाच्या पुणे ते दिल्ली विमानाला धडकला पक्षी, मोठा अनर्थ टळला, धक्कादायक माहिती आली समोर…

पुणे : काही दिवसांपूर्वी अहमदाबाद लंडन या विमानाचा अपघात होऊन 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. हा विमान अपघात खूपच भयंकर होता. असे असताना एअर इंडियाच्या पुणे ते दिल्ली असा प्रवास करणाऱ्या विमानाला पक्षी धडकल्याचे समोर आले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली.

पक्षी धडकल्यानंतर विमानाचं व्यवस्थितरित्या लँडिंग करण्यात आलं. नंतर इंजिनिअरिंग टीमकडून या विमानाच्या तपासणीसाठी एअर इंडियाचं पुणे ते दिल्ली AI 2470 हे विमान रद्द करण्यात आलं आहे. सध्या विमानाची अजून व्यवस्थित तपासणी करण्यात आली आहे. याबाबत खबरदारी घेतली जात आहे.
हे विमान रद्द करण्यात आल्यानंतर एअर इंडियाकडून पुणे ते दिल्ली AI 2470 या विमानातील प्रवाशांची पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, पुण्याहून दिल्लीला जाणारे AI 2470 विमान पक्षी धडकल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. तर पुणे ते दिल्ली AI 2470 या विमानाला पक्षी धडकल्याचा प्रकार पुण्यात उतरल्यानंतर लक्षात आला.

यानंतर याबाबत विमानाची तपासणी करण्यात आली आहे. या घटनेनंतर अडकलेल्या प्रवाशांसाठी राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था करण्यासह सर्व व्यवस्था एअर इंडिया करत आहे. तिकिटे रद्द केल्यास प्रवाशांना पैसे परत करण्याचा किंवा प्रवास पुन्हा करण्याचा पर्याय दिला जात आहे.

याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. तसेच प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. दरम्यान, सध्या विमान आपत्कालीन लँडिंगच्या घटना देखील वाढत आहेत. अहमदाबाद मधील विमान दुर्घटनेनंतर सध्या विमान कंपन्या खबरदारी घेत आहेत.