ऊस शेतीच्या आधुनिक बदलासाठी इंडिया-ब्राझिल शुगर ॲंड बायो एनर्जी मिशन या अभ्यास दौऱ्याचे ब्राझिलमध्ये आयोजन, शेतकऱ्यांना होणार फायदा..

ब्राझिल : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पुढाकाराने “इंडिया-ब्राझिल शुगर ॲंड बायो एनर्जी मिशन” हा अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे. जगातील सर्वाधिक उत्कृष्ट व नियोजनबद्ध ऊस उत्पादन करणारा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझील येथे हा अभ्यास दौरा पार पडला. यामध्ये उसाच्या अनेक गोष्टींची चर्चा झाली.
या दौऱ्याचा उद्देश ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून साखर व सहउत्पादनांच्या माध्यमातून उद्योगास उभारी देणे, तसेच नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस उत्पादकांना अधिक समृद्ध बनविणे हा आहे. CANE COUNTRY या नावानेही ब्राझील ओळखला जातो. जागतिक ऊस लागडीखालील क्षेत्रामध्ये ३३ टक्के, तर ऊस उत्पादनात ४० टक्के एवढा विक्रमी वाटा असणारा हा जगातील प्रथम क्रमांकाचा देश.
ब्राझीलमध्ये सुपीक जमिनी, अनुकूल हवामान व पर्जन्यमान, विस्तीर्ण क्षेत्रामुळे शेतीचे यांत्रिकीकरण, किमान सहा खोडवे, यांत्रिकी तोडीमुळे पाचटाचे आच्छादन, सुधारित ऊस जाती अशा सर्वच गुणवैशिष्ट्यांमुळे इतर देशांच्या तुलनेत येथील ऊस उत्पादन खर्च कमी आहे. उसाची वाढ जोमाने व्हावी यासाठी साखर व इथेनॉल उत्पादनाच्या प्रक्रियेदरम्यान बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचा वापर केला जातो.
उभा अभ्यास दौऱ्यात उसाच्या जाती, तसेच पाण्याचा वापर, कमी काळात आणि कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी काय गरजेचे आहे, याची देखील माहिती दिली जाणार असून यामुळे याचा शेतकऱ्यांना अनेक प्रकारे फायदा होणार आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पुढाकाराने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
इंडिया-ब्राझिल शुगर ॲंड बायो एनर्जी मिशन या अभ्यास दौऱ्यात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह काही आमदार देखील सहभागी झाले आहेत. याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी माहिती दिली आहे.