सरपंचपदासाठी राज्यात पुन्हा आरक्षण सोडत, ओबीसींची सरपंचपदे वाढणार, खुल्या प्रवर्गाचा कोटा घटला, जाणून घ्या….


पुणे : राज्याच्या ग्रामविकास विभागाने मार्च २०२५ मध्ये अधिसूचना काढून २६.०४ टक्के यानुसार इतर मागास प्रवर्गाचे (ओबीसी) सरपंचपदाचे कमी आरक्षण जिल्ह्यांना दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागास प्रवर्गाचे (ओबीसी) २७ टक्के आरक्षण मान्य केले.

यामुळे ग्रामविकास विभागाने दिलेले पूर्वीचे सरपंच आरक्षण रद्दबातल झाले आहे. आता राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून ओबीसींच्या सरपंच पदाच्या वाढीव कोट्यासह पुन्हा अरक्षण सोडत काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. राज्याच्या प्रामविकास विभागाने २०३० पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचा कोटा निश्चित केला.

त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी १३ हजार ६७, ओबीसी ६ हजार ७२९, एससी ३ हजार २६२ वर एसटीची १ हजार ८६६ सरपंचपदे आहेत. त्यापैकी महिलांसाठी १२४९६ पदे राखीव ठेवण्यात येणार आहेत. लवकरच तालुकानिहाय सरपंचपदाचा कोटा निश्चित करून तो जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना कळवण्यात येणार आहे, याबाबत माहिती समोर आली आहे.

याबाबत तहसीलदारांकडून तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी दहा दिवसांत आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. राज्यात १२४९६ महिलांना थेट सरपंचपदाची संधी मिळणार आहे. यामुळे गावपातळीवर महिलांचे निर्णय घेण्याचे अधिकार वाढतील व सामाजिक बदल घडेल.

या नव्या बदलानुसार राज्यात खुल्या प्रवर्गात गेलेली ओबीसी सरपंचपदे ही पुन्हा ओबीसी प्रवर्गात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात नव्याने सरपंचपदाची आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत बदल दिसणार आहे. सरपंचपदाच्या तालुकानिहाय कोट्याने वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लवकरच संबंधित तहसील कार्यालयाला केले जाणार आहे.

जिल्ह्यातील सरपंचपदाचा कोटा प्राप्त झाल्यानंतर त्याचे तालुकानिहाय वितरण करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी कोणत्या आरक्षण प्रवर्गात कोणते पद वेणार, यासाठी तहसिलदार आरक्षण सोडत प्रक्रिया राबवणार आहेत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

सरपंचपदाचा आरक्षण कोटा नव्याने जाहीर झाल्यामुळे पुन्हा राजकीय समीकरणे बदलणार आहेत. यामुळे राजकीय गणित बदलणार आहेत. यामुळे याकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष लागले असून त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!