एकाच खोलीत एकाच ओढणीने तरुण-तरुणीने संपवलं जीवन, शेवटच्या चिठ्ठीत केला ‘नात्याचा’ उल्लेख, घटनेनं सोलापूर हादरलं…


सोलापूर : सोलापुरातील कर्णिक नगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका घरात एका तरुण आणि तरुणीने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे. आत्महत्या करणाऱ्यापूर्वी या दोघांनी भाऊ-बहीण असल्याचा उल्लेख लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये केल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापुरातील कर्णिक नगर येथील ही घटना आहे. आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. रोहित ठणकेदार, अश्विनी केशापुरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुण-तरुणीचे नाव आहे.

मयत अश्विनीने रोहितची ओळख कुटुंबियांना मानलेला भाऊ अशीच करून दिलेली होती. मात्र मयत रोहित याच्या कुटुंबियांना अश्विनी बद्दल कोणतीही माहिती नसल्याचा कुटुंबियांचा दावा आहे. ‘आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत, त्यामुळे आत्महत्या केल्यानंतर आमच्यावर शंका घेऊ नका’ असा उल्लेख आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये केल्याची माहिती आहे.

दोघांनी चिठ्ठीत लिहिलं की, ‘आम्ही दोघं बहीण भाऊ आहोत, विनाकारण आमच्यावर संशय घेऊ नका. आमच्या आत्महत्येला आई वडील जबाबदार नाहीयेत. एकाच वयाच्या दोघांनी अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते, यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुरामुळे दोघांच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. दोघांनी आत्महत्या का केली, याचा तपास पोलीस करत आहे.

रोहित ठणकेदार हा चालक म्हणून काम करत होता. तर अश्विनी ही कर्नाटकातील एका महाविद्यालायत बी फार्मसीचे शिक्षण घेत होती. दरम्यान दोघांनी आत्महत्या केल्याची मिळताच कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयात प्रचंड आक्रोश व्यक्त केला. याप्रकरणाची सिव्हील हॉस्पिटल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर पोलीस आत्महत्यामागे नेमके काय कारण आहे, याचा तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!