प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं, नवऱ्याने बायकोचं नाकचं तोडलं, नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेश : नवऱ्याने बायकोच्या नाकाला चावा घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
बायको प्रियकराला भेटायला गेल्याने संतापलेल्या पतीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. गंभीर जखमी झालेल्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांना नवऱ्याला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमात वेडी झालेली एक महिला तिच्या प्रियकराच्या घरी त्याला भेटण्यासाठी गेली होती. मात्र पतीला संशय आल्याने त्याने तिचा पाठलाग केला. प्रियकराच्या घरी पोहोचल्यानंतर नवऱ्यांना बायको आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडले.
पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाहून संतापलेल्या नवऱ्याने तिच्या नाकाला जोरदार चावा घेतला. रक्तबंबाळ झालेल्या महिलेला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची स्थिती पाहून डॉक्टरांनी तिला ताबडतोब लखनऊ मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी पतीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. जखमी महिलेचे म्हणणे आहे की तिच्या सासरच्या लोकांनी आणि कुटुंबियांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
यातून सुटण्यासाठी ती तिचा प्रियकर सुशीलच्या घरी पोहोचली होती. पण सुशीलच्या भावाने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना तिथे बोलावून घेतले. सुशील तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण संधी मिळताच त्याने तिच्या नाकावर हल्ला केला.
दरम्यान, महिलेचे म्हणणे आहे की ती गेल्या १० महिन्यांपासून सुशीलवर प्रेम करत आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे, त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.