लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी! सरकारकडून विशेष आर्थिक योजना सुरु, होणार मोठा फायदा, जाणून घ्या..

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

तसेच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून आर्थिक मदत मिळवणाऱ्या महिलांसाठी आता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग खुला करण्यासाठी सरकारने महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यास आणि त्यांची नोंदणी करण्यास परवानगी दिली आहे.
यामुळे महिलांना बचत, कर्ज सुविधा आणि स्वयंरोजगारासाठी नवसंजीवनी मिळणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, पात्र महिलांच्या सहभागातून स्थापन होणाऱ्या या संस्थांची नोंदणी ८ मार्च २०१९ च्या परिपत्रकानुसार केली जाणार आहे.

यामध्ये शहर, नगरपालिका, गाव व तालुका कार्यक्षेत्रानुसार सभासदसंख्या आणि भांडवली रक्कमेचे निकष ठरवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेतील महिलांना स्वतःचा पतसंस्था बिझनेस सुरू करता येणार आहे.
त्यातून बचत व लघुवित्ताच्या माध्यमातून महिलांमध्ये स्वावलंबन, उद्योजकता आणि सामाजिक भक्कमपणा निर्माण होण्यास मदत होईल. कर्जसुविधा, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाचे स्वातंत्र्य मिळेल.
महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई, ठाणे, नवी मुंबई): किमान 2,000 सभासद व ₹30 लाख भांडवल आवश्यक
तालुका क्षेत्र: 500 सभासद व ₹5 लाख भांडवल
गाव कार्यक्षेत्र: 250 सभासद व ₹1.5 लाख भांडवल
जिल्हास्तर: 1,500 सभासद व ₹10 लाख भांडवल
नोंदणी करताना महिलांची अधिकृत यादी महिला व बालविकास विभागाकडून प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे.
पतसंस्थेच्या नोंदणीसाठी प्रत्येक प्रवर्तकाने न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यात खालील बाबींचा समावेश असावा:
100% KYC पूर्तता.
कोणत्याही प्रकारचा सावकारी व्यवसाय नाही.
सहकारी संस्थांमध्ये थकबाकीदार नाहीत.
इतर सहकारी संस्थांचे संचालक नाहीत