कोल्हापुर हादरले! ११ वर्षाच्या मुलाचं हादरवणारं हत्याकांड, धार्मिक संस्थेत मित्रालाच शॉक देऊन संपवलं..

कोल्हापुर : एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची घटना कोल्हापुरातून समोर आली आहे. ही घटना कोल्हापुर येथील हातकणंगले तालुक्यातील आळते येथून समोर आली आहे.
फैजान नाजिमा (वय.११) मृत मुलाचे नाव आहे. या संस्थेतील एका अल्पवयीन मुलानेच फैजानची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आळते येथे असणाऱ्या या धार्मिक शिक्षण संस्थेत बाहेरच्या राज्यातून विद्यार्थी शिक्षणाासाठी येत असतात.या मध्ये बहुतेक सर्वाधिक विद्यार्थी हे बिहारमधील आहे. हत्या झालेला फैजाम हा देखील बिहारचा होता. तसेच ज्या विद्यार्थ्याने हत्या केली तो देखील बिहारचा होता.
हत्या केलेल्या विद्यार्थ्याला संस्थेत करमत नव्हते त्याला घारची ओढ लागली होती. जर आपण हत्या केली तरी संस्था बंद पडेल आणि आपल्याला घरी जायला भेटेल या हेतूने त्याने फैजानची शॉक देऊन हत्या केली. मुलांची चौकशी केल्यानंतर संस्थेतील विद्यार्थ्यानेच आपण फैजानला इलेक्ट्रिकल वायरने शॉक देत हत्या केल्याचे सांगितले.
दरम्यान, हातकणंगले तालुक्यात आळते या गावात धार्मिक शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेत बहुसंख्य विद्यार्थी हे बिहार या राज्यातील आहेत. एकूण 80 मुलं या संस्थेत धार्मिक शिक्षण घेतात. त्यापैकी ७० विद्यार्थी हे बिहारचे आहेत. अल्पवयीन मुलं घर सोडून शे परराज्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात येतात, तिथे धार्मिक शिक्षण घेतात. घरापासून लांब राहण्याला वैतागून विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं.