सर्वात मोठी बातमी! आता टोलची कटकट संपणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

नवी दिल्ली : देशभरातील कार, जीप आणि व्हॅनसारख्या खासगी वाहनांसाठी आता Annual FASTag Pass उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे टोल प्लाझावर पुन्हा पुन्हा टोल भरण्याची अडचण दूर होणार असून, प्रवास अधिक सुलभ व वेगवान होणार आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी खासगी वाहनांसाठी ही महत्त्वाची घोषणा केली.
यामुळे आता टोल प्लाझावर पुन्हा पुन्हा टोल भरण्याची अडचण दूर होणार असून, प्रवास अधिक सुलभ व वेगवान होणार आहे. हा पास फक्त खासगी वाहनांसाठी असणार आहे आणि याचा प्रवासी व कारचालकांनाच लाभ मिळणार आहे. जे नागरिक टोल प्लाझाच्या 60 किमी परिसरात राहतात, त्यांच्यासाठी तर ही योजना अधिक फायदेशीर आहे.
याबाबत पास 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे. त्यासाठी ग्राहकांना 3000 रुपये इतकी एकदाच रक्कम भरावी लागेल. सध्या मासिक टोल पास 340 रुपये दरमहा (वार्षिक 4,080 रुपये) दराने उपलब्ध आहे, पण नवीन वार्षिक पास केवळ 3000 रुपयात मिळणार आहे. एकदा सक्रिय झाल्यानंतर हा पास एक वर्ष किंवा 200 ट्रिप्सपर्यंत वैध असेल. यापैकी जी अट आधी पूर्ण होईल, ती लागू राहील.
दरम्यान, या निर्णयामुळे वारंवार प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. वाहनधारक Rajmarg Yatra App, NHAI च्या वेबसाइट किंवा MoRTH च्या पोर्टलवरून सहज पास अॅक्टिव्हेट किंवा नूतनीकरण करू शकतील. यामुळे डिजिटल व्यवहाराला चालना मिळणार आहे. याबाबतची मागणी केली जात होती.