बडी हस्ती मिट गयी हमे झुकाने में बेटा तू कोशिश भी मत करना, तेरी उमर गुजर जायेगी हमे गिराने में!! 85 वर्षांच्या तावरेंनी दादांचं चॅलेंज स्वीकारलं..

बारामती : बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये सध्या जोरदार टक्कर सुरु आहे. अजित पवार सध्या बारामतीमध्ये ठाण मांडून आहेत. तसेच स्वतः उमेदवार आणि चेअरमन होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सध्या अजितदादांच्या एका वक्तव्याने माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक चर्चेत आली.
85 वर्षांचा दाखला देत प्रतिस्पर्धी चंद्रराव तावरे यांना अजित पवार यांनी आव्हान दिले आहे आणि आता तावरे यांनी अजित पवार यांचा आव्हान स्वीकारलंय. चंद्रराव तावरे यांच वय सांगून अजित पवार आव्हान दिले होते. यानंतर आता वातावरण तापले आहे. तावरे यांचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाले असून दादांच्या वक्तव्यामुळे तावरेंचा फायदाच होत असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवार तावरे यांचं वय काढत असल्याने आता तावरे यांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर लावून व्हाट्सअप वर स्टेटस ठेवले आहे. यामध्ये अजित पवार यांना मेसेज देण्यात आला की, बडी से बडी हस्ती मिट गयी हमे झुकाने में बेटा तू तो कोशिश भी मत करना तेरी उमर गुजर जायेगी हमे गिराने में. यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे.
सध्या अजित पवार यांच्याच पॅनलकडे माळेगाव कारखाना होता. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 22 जूनला निवडणूक आहे. एकूण 19 हजार 750 सभासद मतदान करणार आहेत. 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत. अजित पवार यांचे श्री नीळकंठेश्वर पॅनल शरद पवार यांच बळीराजा पॅनल चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल तर कष्टकरी शेतकरी पॅनलसह काही अपक्ष आहेत.
यामध्ये मुख्य लढत ही अजित पवार यांच्या श्री नीळकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलमध्येच असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मुख्यमंत्री व्हायचे सोडून अजित पवार चेअरमन होत असल्याने त्यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. यामुळे निकाल नेमका काय लागणार यावर अनेक गणित अवलंबून आहेत.