मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप, सुधाकर बडगुजरांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश…

नाशिक : नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली आहे. सुधाकर बडगुजर यांची काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
यावेळी भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा बूस्ट मिळाला आहे. पक्षप्रवेशाआधी सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्या समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. यावेळी बबन घोलप, काँग्रेस आणि इतर पक्षांतील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला.तसेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सुरुवातीला बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला होता, मात्र तो विरोध झुगारून पक्षाने त्यांचा स्वीकार केला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले की, आज माझा भाजपमध्ये प्रवेश झाला. मी भाजपच्या नेत्यांचे आभार मानतो. मी समाजासाठी झटतो, समाजाची सेवा करतो. कोरोना काळात मी अनेक रक्तदान शिबीरे घेतली. कोणी बाहेर येत नव्हते त्यावेळी मी कोविड सेंटर सुरु केलं.
पक्षासाठी काम केलं. परंतू नियतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने माझा अनादर केला, त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.