मोठी बातमी! इंडिगो विमानाचे नागपूरमध्ये इमर्जन्सी लॅण्डिंग, धक्कादायक कारण समोर…


नागपूर : अहमदाबाद मुंबईनंतर आता आणखा एका विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरमध्ये या विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले आहे. इंडिगोच्या विमानाचे देखील इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आल्याने खळबळ उडालीये.

या विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलीये. हे विमान कोचीहून दिल्लीला निघाले असताना विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. यानंतर नागपूर विमानतळावर हे विमान उतरवण्यात आले.

विमानात १५७ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 2706 या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानाची नागपूर येथे आपत्कालीन लॅण्डिंग करण्यात आली.

विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करून लगेचच प्रवाश्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यानंतर संपूर्ण विमानाची तपासणी केली जातंय. खरोखरच विमानात बॉम्ब ठेवण्यात आलाय का? याची तसापणी सध्या सुरू आहे. या धमकीकडे जास्त गांर्भीयाने बघण्यासाठीचे महत्वाचे कारण म्हणजे धमकी देणाऱ्याने याच विमानाचा बरोबर नंबर नमून केला होता. ज्यावेळी ही धमकी देण्यात आली, त्यावेळी विमान कोचीहून निघाले होते.

ही फ्लाइट सकाळी 9:20 मिनिटांनी कोचीहून रवाना झाली होती. सध्या नागपूर विमानतळावर पोलीस, बॉम्ब शोध पथक आणि अग्निशमन दल पोहोचले असून संपूर्ण विमानाची कसून तपासणी केली जात आहे. विमान सुमारे वीस मिनिटांपूर्वी नागपूर विमानतळावर उतरलं. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही, अशी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!