उरुळी कांचन येथे पायी चालणाऱ्या महिलेला पाठीमागून चिरडणाऱ्या डंपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल…


उरुळीकांचन : सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकात रस्ता ओलांडणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेला टँकरने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आज सोमवारी (दि. १६) सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकणी एकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमिला अशोक गोळे (वय- ५०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकणी तेजस दिलीप गोळे (वय. ३२ वर्ष, शिक्षण बी.ई मॅकेनीकल, व्यवसाय नोकरी राहणार गोळेवस्ती उरुळीकांचन ता.हवेली जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बबन पांडूरंग सावंत (रा. बायफ रोड ऊरुळीकांचन ता. हवेली जि.पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काल (ता.१६) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मौजे उरुळीकांचन गावच्या हददीत पुणे ते सोलापूर रोडवर तळवाडी चौक येथे बबन पांडूरंग सावंत (रा. बायफ रोड ऊरुळीकांचन ता. हवेली जि.पुणे) याने आपले ताब्यातील भारत बंझ कंपणीचा हायवा नंबर MH 12 TV 3702 हा हयगयीने भरधाव वेगात चालवून यवत बाजूकडे जाण्यासाठी यु टर्न घेत असतांना फिर्यादी यांची चुलती प्रमीला अशोक गोळे चालत जात असताना पाठीमागुन जोरात धडक दिली.

या अपघातात त्यांना जोरदार जखमा झाल्या होत्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!