विरोधकांनो मी सगळं बघितलंय ब वर्गातून मला चेअरमन होता येतं, मीच पाच वर्ष चेअरमन राहणारं! अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं..


बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सध्या राजकीय वातावरण तापले आहे. दोन दिवसापासून विरोधकांनी ब वर्गातून चेअरमन होता येत नाही असं सांगण्यास सुरुवात केली होती. यामुले अजित पवार काहीसे बॅकफूटवर गेले होते, असे असताना त्यांनी आता विरोधी रंजनकाका तावरे यांना जोरदार उत्तर दिले आहे.

अजित पवार म्हणाले, कायद्याच्या कसोटीवर मी सगळं बघितलंय. कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, ब वर्गातून संचालक होऊन कारखान्याचे चेअरमन होता येतं, अन् मीच पाच वर्ष चेअरमन राहणार. मी तुमचा विश्वासघात करणार नाही. पुणे जिल्हा बँकेमध्ये रणजीत तावरे यांना संचालक केले तेव्हा विरोधक म्हणाले यांना वेळ नाही.

मी यापुढे संचालक होणार नाही असे ठरवले पण मी चेअरमन होणार नाही अशी कुठे म्हणालो? इथे मी अध्यक्ष होणार आहे मग त्यांच्या पोटात का दुखते? असा सवाल पुन्हा त्यांनी एकदा केला. यामुळे आता याठिकाणी जोरदार टीका टिप्पणी सुरु आहे. कारखान्याचे चेअरमन स्वतः अजित पवारच होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यामुळे आता निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

पवार यांनी माळेगांवच भल करायचं असेल तर अजित पवारच करू शकतो. कारखानदारी अडचणीत आहे, असेही ते म्हणाले. तसेच ते म्हणाले, प्रपंचाचा ठिकाणी वाद मतभेद बाजूला ठेवा. कुणी गडबड केली तर आताच एकवीस उमेदवारांची राजीनामे घेतले आहेत. तुम्ही मला आठ वेळा आमदार म्हणून निवडून दिलं आहे. एकदा खासदार केलं आहे. लवकर उठून जनतेची काम करत असतो.

तसेच सगळ्यांनी पॅनल टू पॅनल मतदान करा. माझ्याकडे बघून मतदान करा. तुमचा चेअरमन मीच होणार असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच त्यांनी विरोधकांवर अजित पवार यांनी फॉर्म का भरला? तुमच्या का पोटात दुखतंय? तुम्हाला आता मुद्दा राहिला नाही. खोटं बोलायचं. समोरासमोर या. आता होणाऱ्या संचालकांना गाडी, हॉटेलच बिल मिळणार नाही. असेही ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!