महिलेवर जबरदस्ती करणाऱ्या नराधमाचे महिलेनेच कापले गुप्तांग, धक्कादायक घटनेने सगळेच हादरले…

बिहार : बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील पारू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी एका तरुणाने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेने धारदार चाकूने त्या तरुणाचे गुप्तांग कापून टाकले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली.

गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत. एका तरुणाने तिला काही पैसे दिले होते. तो पैसे मागण्याच्या बहाण्याने तिच्या घरात घुसला. घरात ती एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, असे या महिलेचे म्हणणे आहे.
त्या तरुणाने बळजबरी सुरू केली. यावेळी तिने तरुणाच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला चाकूच्या या हल्ल्यामुळे तो तरुण गंभीर जखमी झाला. पण अजूनपर्यंत कोणीही पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केलेली नाही. दरम्यान, जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत तरुण म्हणाला की, आपले पैसे मागण्यासाठी गेला होता आणि महिलेने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याने बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप नाकारला असून त्याला बदनाम करण्याचा हा कट आहे. पैसे न दिल्याने त्याला बदनाम केले जात असल्याचे देखील त्याने म्हटले आहे.
दरम्यान, ग्रामीण एसपी विद्यासागर यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाली आहे, पण अद्याप कोणत्याही पक्षाकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. अर्ज मिळाल्यावर चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल. या घटनेची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे.