पुणे जिल्ह्यात आता 73 गट व 146 गण निश्चित!! इंदापूर, जुन्नर, खेड, दौंड, भोरमध्ये प्रत्येकी एका गटाची वाढ..

पुणे : राज्य सरकारने पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी यापूर्वी 2022 मध्ये निश्चित केलेली गट- गण रचना अंतिम केली आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. या नवीन गट गण रचनेनुसार आता पुणे जिल्हा परिषदेचे 73 गट व 146 गण निश्चित केले आहेत. त्यासंदर्भातील अद्यादेश जाहिर केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामध्ये लोकसंख्येची सरासरी काढून हे गट निश्चित करण्यात आले आहेत. जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात गट संख्येत वाढ झाली आहे. या तालुक्यात गट-गणांच्या रचनेत मोठे फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट झाले. गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने हवेली तालुक्यातील 7 गट कमी झाले असून, नवीन गट रचनेत जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एक गटांची वाढ झाली आहे.
हवेली आणि मुळशी तालुक्यातील 23 गावे तब्बल अडीच लाख पेक्षा अधिक ग्रामीण लोकसंख्या महापालिका हद्दीत समाविष्ट झाली आहे. यामुळे पुणे जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या नगर जिल्ह्यापेक्षा कमी झाल्याने गटाची 2 व गणांची संख्या 4 ने कमी झाली आहे. यामुळेच नव्याने कोणत्या तालुक्यात गट-गण वाढवता येतील याबाबत संबंधीत सर्व अधिकाऱ्यांची बैठक झाली.

नवीन नियमानुसार तालुकानिहाय 73 गट व 146 गणांची संख्या निश्चित केली आहे. हवेली तालुक्यातील गट संख्या तब्बल 7 ने कमी झाली आहे. जिल्ह्यातील गट-गणांची असे झाले फेरबदल, तालुका नवीन गट नवीन गण: बारामती 6 12, इंदापूर 8 16, जुन्नर 8 16, आंबेगाव 5 10, शिरूर 7 14, खेड 8 16, मावळ 5 10, मुळशी 3 06, हवेली 6 12, दौंड 7 14, पुरंदर 4 08, वेल्हा 2 04, भोर 4 08, एकूण 73 146 अशी रचना आहे.
