माणुसकी मेली! विमान अपघातात महिलेचे शीर रस्त्यावर पडले, बघ्यांनी चक्क फोटो आणि सेल्फी काढले; हृदय पिळवटून टाकणारे दृश्य..

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानी परिसरात काल दुपारी (ता.१२) एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. त्यावेळी विमानात २४२ प्रवासी होते. अहमदाबाद एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणातंच हे विमानत मेघानी परिसरातील नागरी वस्तीतील इमारतीवर कोसळले.

त्यामुळे मोठी जीवित हानि झाली असून अक्षरश: हाहा:कार उडाला आहे. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आणि विमानाचे तुकडे यामुळे घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पसरले होते.
अपघातग्रस्त स्थळावरुन अनेक फोटो, व्हिडिओ समोर येत असतानाच आता असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहुन माणुसकीच मेली असं म्हणायचं का? असा प्रश्न उपस्थित आहे. कारण, विमान कोसळलं त्या ठिकाणाहून अवघ्या काही अंतरावर एका महिलेचे शीर रस्त्यावर पडलेले दिसून आले.

या ठिकाणी बघ्यांनी एकच गर्दी केली इतकेच नाही तर उपस्थितांनी त्याचे फोटो आणि सेल्फी काढण्यास सुरुवात झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेला हा व्हिडिओ अहमदाबाद विमान अपघातस्थळावरचा असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओत दिसत आहे की, विमान अपघातानंतर एका महिलेचं शीर रस्त्यावर पडलं आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. अपघातानंतर घटनास्थळावर मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू झाले. मदत आणि बचावकार्य सुरू असतानाच दुसरीकडे मात्र, बघ्यांनी केलेल्या या कृत्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.