करिश्मा कपूरवर दु:खाचा डोंगर, हार्ट अटॅकने संजय कपूरचं निधन…


मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरच निधन झालं आहे. संजय कपूर ५३ वर्षांचा होता. गुरुवारी रात्री त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली. संजय कपूर सध्या UK मध्ये होता. पोलो खेळत असताना अचानक हार्ट अटॅक आल्याने त्याचं निधन झालं.

या बातमीने कपूर आणि सचदेव कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी काही तास संजय कपूर यांनी अहमदाबाद विमान अपघातावर शोक व्यक्त करत केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संजय कपूर हे यूकेमध्ये हॉर्स पोलो खेळत असताना मैदानावरच कोसळले. तातडीने वैद्यकीय मदत मिळवूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. ते ऑटो कंपोनेंट्स उत्पादन करणाऱ्या ‘सोना कॉमस्टार’ कंपनीचे चेअरमन होते. त्यांच्या अकस्मात जाण्याने कॉर्पोरेट क्षेत्रातही मोठा धक्का बसला आहे.

संजय कपूर यांनी १२ जून रोजी अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातावर प्रतिक्रिया देत ट्विट देखील केलं होतं: हे ट्विट आता संजय कपूर यांच्या अंतिम संदेशापैकी एक ठरलं आहे, आणि त्यामध्ये व्यक्त केलेली भावना अजूनच हृदय पिळवटून टाकणारी वाटत आहे.

संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचं लग्न २००३ साली झालं होतं. हे लग्न १३ वर्ष टिकून २०१६ साली घटस्फोट झाला. त्यानंतर २०१७ साली संजय कपूर यांनी प्रिया सचदेव हिच्याशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आहे – अजारियस, जो आता फक्त ७ वर्षांचा आहे. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांना समायरा आणि कियान हे दोन मुलं आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!