ब्रेक लावला अन् सळई अंगात घुसली…पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात, एकाचा मृत्यू..

पुणे : पुण्यातील चांदणी चौकात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून, एका कंटेनर ट्रकला मोठा अपघात झाला आहे. अर्टिगा कारला वाचवण्याच्या प्रयत्नात करकचून ब्रेक दाबल्यामुळे सळ्या केबिनमध्ये घुसून झालेल्या अपघातात ट्रेलर चालक आणि साथीदाराला प्राण गमवावे लागले.
मुंबईकडून बंगळूरूकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळं चौकात मोठी वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे.
या ट्रकमध्ये बांधकामासाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणावर लोखंडी रॉड्स होते. ही घटना मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर घडली आहे. ट्रक मध्ये असलेले लांब लोखंडी रॉड्स योग्य प्रकारे बांधले गेले नव्हते. ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबताच, मागील बाजूला असलेले रॉड्स जोरात पुढे सरकले आणि थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसले.
यामध्ये चालक जागीच ठार झाला, तर क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. ट्रक हे लांब लोखंडी रॉड्स घेऊन ते चांदणी चौकातून मुंबईच्या दिशेने निघाला होती. यावेळी अचानक ब्रेक दाबल्यानं यातील सळया किंवा लोखंडी बार हे थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसले. यामध्ये ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला.
लोखंडी सळ्या आणि पाईप वाहतूक करणारा हा ट्रेलर चांदणी चौकाच्या अलिकडे महामार्गाच्या सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाजवळ पोहोचला. इतक्यात एक अर्टिगा कार त्याला आडवी आली. अर्टिगा चालकाने या ट्रेलरसमोर येऊन आपलं वाहन विरुद्ध दिशेला वळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ट्रेलर चालकाने अर्टिगा कारला वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबला.
दरम्यान, त्यामुळे ट्रेलरमध्ये असणाऱ्या सळ्या आणि पाईप या थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसल्या. यातच चालकाचा आणि त्याच्या साथीदाराचा मृत्यू झाला. हा ट्रेलर मूळचा राजस्थानचा असून ट्रेलर चालक हाच याचा मालक असल्याची माहिती मिळत आहे.