नवऱ्याकडून महिलेचा छळ; मित्रांसोबत शारीरिक संबध ठेवण्यास भाग पाडलं, दौंड तालुक्यातील घटनेने खळबळ..


दौंड : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पत्नीला मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. दौंड तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी ही घटना घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी नवऱ्यासह चौघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरतगाव येथील एका विवाहित महिलेला तिचा पती स्वतःच्या तीन मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. मागील दोन वर्षांपासून हा सगळा प्रकार सुरु होता. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 2023 पासून एप्रिल 2025 पर्यंत सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ सहन करत होती.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या इच्छेविरुद्ध शेतात आणि घरी तिच्या पतीने त्याच्या मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी पत्नीवर दबाव टाकला. पीडितेने अखेर यवत पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.

दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात पतीसह चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!