सर्वात मोठी बातमी! गुजरातमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं, अनेकांचे मृत्यू? बचावकार्य सुरू…


अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा देशातील सर्वात मोठा विमान अपघात असल्याचे सांगितले जात आहे. मेघानीनगर परिसरात  प्रवासी विमान कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.

या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रूपानी देखील असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये 242 प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे. हे विमान पडल्यानंतर मोठा स्फोट झाला असून याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. एअर इंडियाचं विमान असल्याचे समजते. घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या आहे.

विमान अपघाताच्या कारणांबाबतही अद्याप स्पष्टता नाही. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत तपास सुरू आहे.

विमान जिथे क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं दिसून येत आहे, घटनास्थळी बचाव पथक पोहोचलं आहे. मोठा भीषण अपघात असल्याचे सांगितले जात असून अनेक गाड्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये मोठी मृत्यूहानी देखील झाल्याचे सांगितले जात आहे.

लंडनला म्हणजे दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानत इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटना पेट घेतला. रहिवासी भागात हे विमान कोसळले आहे. एका इमारतीवर हे विमान कोसळले असल्याचे सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!