मोठी बातमी! माळेगाव सहकारी कारखान्याची अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर, अजित पवार स्वतः मैदानात….


बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सध्या लागली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पॅनलची घोषणा करत उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यामध्ये स्वतः अजित दादा देखील मैदानात उतरले आहेत. यामुळे निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सर्व पक्षीय श्री निळकंठेश्वर पॅनेल माळेगाव गट: बाळासाहेब पाटील तावरे, रणजीत उर्फ शिवराज प्रतापसिंह जाधवराव, राजेंद्र सखाराम बुरुंगले, तसेच पणदरे गटात: तानाजी तात्यासो कोकरे, स्वप्नील शिवाजीराव जगताप, योगेश धनसिंग जगताप, विजय श्रीरंगराव तावरे असे उमेदवार आहेत.

सांगवी गटात: विजय श्रीरंगराव तावरे विरेंद्र अरविंद तावरे, गणपत चंदरराव खलाटे, तसेच खांडज-शिरवली गटात: प्रताप जयसिंग आटोळे, सतीश जयसिंग फाळके, तसेच निरावागज गटात: जयपाल देवकाते, अविनाश देवकाते, बारामती गटात: नितीन सदाशिव सातव, देवीदास सोमनाथ गावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था यामध्ये अजित पवार, तसेच अनूसूचित जाती/जमाती रतनकुमार साहेबराव भोसले, महिला राखीव प्रतिनिधी, संगिता बाळासाहेब कोकरे, ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले, इतर मागास प्रवर्गमध्ये नितीन वामनराव शेंडे, तसेच भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागासमध्ये विलास ऋषीकांत देवकाते यांना संधी देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!