पुणेकरांनो उद्या शहरातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार, जाणून घ्या..

पुणे : उद्या शहरातील अनेक भागांतील पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद राहणार आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्र आणि भामा-आसखेड प्रकल्प अंतर्गत देखभाल-दुरुस्ती व नवीन जलवाहिन्या जोडण्याचे महत्त्वाचे काम करण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम आणि पूर्व पुण्यातील अनेक भागांना पाणीपुरवठा होणार नाही. याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचं आणि त्याचा जपून वापर करण्याचं आवाहन केलं आहे. शुक्रवारी पाणीपुरवठा सुरू झाला तरी तो कमी दाबाने असेल. त्यामुळे १२ व १३ जून या दोन्ही दिवसांसाठी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. असेही सांगण्यात आले आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील विविध टाक्यांना नवीन जलवाहिन्या जोडल्या जाणार.
यामध्ये भामा-आसखेड योजनेत पाणी वितरणातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी चाचणी. या सर्व कामांमुळे १२ जून दिवसभर पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. १३ जून रोजी सकाळपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. यामध्ये बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विजयनगर, दत्तनगर, आंबेडकर नगर, मेडीपॉइंट रोड या भागांमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच कोथरुड, बाणेर, बालेवाडी, वारजे, पाषाण, बावधन, भूगाव रोड, सुस रोड, निम्हणमळा, लम्हाण तांडा, डुक्करखिंड, शास्त्रीनगर, भुसारी कॉलनी, गुरूगणेश नगर, सारथी शिल्प, शांतीबन, परमहंस नगर, धनकुडे वस्ती, सुस, म्हाळुंगे. धानोरी, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, येरवडा, संजय पार्क, लोहगाव, बोराटे वस्ती, शेजवळ पार्क (खराडी). या ठिकाणांचा समावेश आहे.
दरम्यान, वारजे जलशुद्धीकरण केंद्र आणि भामा-आसखेड प्रकल्प अंतर्गत देखभाल-दुरुस्ती व नवीन जलवाहिन्या जोडण्याचे महत्त्वाचे काम आहे. यामुळे पश्चिम आणि पूर्व पुण्यातील अनेक भागांना पाणीपुरवठा होणार नाही. याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यामुळेतसे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.