पुढील 7 जन्म काय 7 मिनिट अशी बायको नको!! पुरुष संघटनेने मारल्या पिंपळाला फेऱ्या, छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगळीच वटपौर्णिमा…


छत्रपती संभाजीनगर : आज वटसावित्री पौर्णिमा हा सण महिलांचा एक महत्वाचा सण आहे. यादिवशी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून “सात जन्मी हाच पती लाभो” अशी प्रार्थना करण्यासाठी साजरा केला जातो. आज सगळीकडे या सणाचा उत्साह दिसून येत आहे. असे असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगरातील पत्नीपीडित पुरुष संघटनेने पिंपळ पौर्णिमा नावाने एक वेगळा सामाजिक उपक्रम राबवला. पुरुषांनी पिंपळाच्या झाडाभोवती उलट्या फेऱ्या मारून न्यायव्यवस्थेतील एकतर्फी व कायद्याचा दुरुपयोग होणार नाही यासाठी प्रार्थना केली. त्यांच्या या वागण्याने संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शॉक झाले आहे.

यामुळे याचा विडिओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. महिलांमुळे त्यांच्या पतींचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवन कायद्याचा दुरुपयोग करून विस्कळीत झाले आहे. सरकारने महिला सबलीकरणासाठी विविध कायदे तयार केले. यावेळी पुढील 7 जन्म काय 7 मिनिट नको.असे अनेकांचे म्हणणे होते. विशेष म्हणजे यावेळी अनेक पुरुष उपस्थित होते.

खोट्या गुन्ह्यांमध्ये वापर होऊन, अनेकदा पती व कुटुंबीयांवर जबरदस्तीने आरोप लावले जातात. यामध्ये पुराव्याऐवजी, पुरुषांना अडकवले जाते, ज्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचा मानसिक छळही होतो. आपण अशा नात्यात असतो जे आपल्याला आनंद देत नाहीत आणि वाढण्यास मदत करत नाहीत. एकटे राहण्याच्या भीतीमुळे आपण नात्यात राहतो. यामुळे मोठी अडचण निर्माण होते.

अनेकदा लोक त्यांच्या जोडीदाराचा आदर करत नाहीत. त्यांना तुमच्या वेळेची पर्वा नाही. ते तुमच्याशी आणि तुमच्या मित्रांशीही चांगले वागत नाहीत. ते अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम त्यांच्याशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधावरही होतो. यामुळे सतत भांडणारी बायको नको म्हणत पुरुषांकडून पिंपळाला ७ फेऱ्या मारत प्रार्थना करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!