कर्नाटक विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर…!


बंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज (29 मार्च) घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नाटक विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे .

त्यानुसार कर्नाटक राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 13 मे रोजी मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. या मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी राज्यभरात 58,282 मतदान केंद्रे उभारली जातील. उल्लेखनिय असे की, 1 एप्रिलपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नोंदणीकृत सर्व तरुण मतदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकतील. नवोदीत मतदारांची संख्या 9.17 लाखांनी वाढली असल्याचेही आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!