ज्या ‘राज’साठी राजाचा जीव गेला, तोच आला समोर, राजा रघुवंशी मर्डर प्रकरणात धक्कादायक खुलासा…


Sonam Raghuvanshi : लग्नाला अजून एक महिना झाला नव्हता… आणि त्या आधीच नवऱ्याचा बळी गेला. हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृत्यू त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा विश्वासघात ठरला. यामागे लव्ह अफेअरचा अँगल समोर येत आहे.

त्यामुळेच सोनम ही बेवफा झाली आणि आपल्या पतीचा खून केला असा तिच्यावर संशय आहे. यात तिला तिच्या प्रेमी राजने ही साथ दिली. त्यालाही आता पोलिसांनी अटक केली आहे. त्यातून त्यांच्या प्रेमाची खतरनाक गोष्टही आता समोर येत आहे. त्यामुळेच खूना सारखं पावूल सोनमनं उचललं.

सोनम रघुवंशीच्या वडीलांची प्लायवूडची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीत राज कुशवाहा हा काम करत होता. सोनम या फॅक्टरीत येत असे. ती काही कामं स्वत: करत असे. त्याच वेळी तिचा संपर्क राज कुशवाह यांच्या बरोबर आला. हळुहळु ओळख वाढत गेली. त्यानंतर संपर्कही वाढला. दोघे ही एकमेकांच्या प्रेमात पडले.

फॅक्टरीतच दोघांचे प्रेम फुलले. अनेक वेळा या दोघांना एकत्र बोलताना पाहीलं जात होतं. विशेष म्हणजे राज हा सोनम पेक्षा वयाने लहान आहे. पण त्यांचे हे प्रेम एका व्यक्तीची हत्या करण्या पर्यंत जाईलं असं कुणालाही वाटलं नव्हतं. दोघांना ही लग्न करायचं होतं. पण घरच्यांचा विरोध होता असंही समजत आहे.

दरम्यान, ज्यावेळी सोनमचं लग्न राजा रघुवंशी बरोबर ठरलं त्यावेळी ती खूश नव्हती. तिच्या सिंदूरच्या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हारयल होत आहे. त्यात ती अजिताबत खूश दिसत नव्हती. तिला राज बरोबर लग्न करायचं होतं. त्यामुळे राज साठी तिने राजाच्या हत्येचा भयंकर कट रचला.

पुढे दोघेही शिलाँगला हनिमुनसाठी रवाना झाले. पुढे 23 मे रोजी शिलाँगच्या नोंग्रियात गावात डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज पाहिल्यानंतर दोघे अचानक बेपत्ता झाले. 2 जून रोजी राजाचा मृतदेह वेईसावडॉन्ग धबधब्याजवळ एका खड्ड्यात सापडला होता. त्यानंतर सोनमचा शोध सुरू झाली. ती बेपत्ता होती. त्यानंतर एक एक अँगल समोर येत गेले.

आता तर मेघालयच्या पर्यटन मंत्र्यांनी ही हे सर्व प्रकरण लव्ह ट्रँगलचा असल्याचं स्पष्ट केलं आहे. पर्यटन मंत्री रघुवंशी दंपत्ती यांनी या हत्येच चार जण सहभागी असल्याचं सांगितलं आहे. या हत्येची मुख्य सुत्रधार ही सोनम रघुवंशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

या शिवाय विशाल सिंह चौहान, राज सिंह कुशवाह आणि आनंद कुर्मी हे अन्य आरोपी त्यांचा या हत्येत सहभाग आहे. राज कुशवाह हा सोनमचा प्रेमी आहे. दरम्यान राजा रघुवंशीचा जीव वाचला असता. त्याला हनिमुनसाठी श्रीलंकेला जायचं होतं. पण सोनमनं मेघालयला जाण्याचा हट्ट धरला होता. जर तो श्रीलंकेला गेला असता तर त्याचा जीव वाचला असता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!