गणेशोत्सवापूर्वी मोठी बातमी! पीओपी मूर्तींवरील बंदी उठली, हायकोर्टाचा दिलासादायक निर्णय…


मुंबई : गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने आज एक ऐतिहासिक आणि निर्णायक निर्णय दिला आहे. पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेश मूर्तींवरील बंदी आता उठवण्यात आली आहे. या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली आहे. मात्र, या मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम राहणार आहे. या निर्णयावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे.

तर न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांच्या आत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, त्याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, या निर्णयानंतर आता घरगुती गणपतीसाठी बनवलेल्या छोट्या पीओपी गणेश मूर्ती साकारण्यास आणि गणेशोत्सव मंडळांमध्येही अशा मूर्ती विराजमान करण्यास कोणताही अडथळा राहिलेला नाही. मात्र, पर्यावरणपूरक विसर्जनाच्या अटींचे पालन अनिवार्य राहील. या निर्णयामुळे अनेक मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे.

शाडू मातीच्या मूर्ती हे पर्यावरणपूरक मानले जात असले तरी, त्यांच्या निर्मितीची मर्यादा आणि खर्च अधिक असल्याने अनेक मूर्तिकार आणि मंडळे POP मूर्तींवर अवलंबून आहेत. याच मुद्द्यावरून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि कोर्टाने आता परिस्थितीनुरूप तडजोडीचा निर्णय घेतला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!